मोबाइलची बॅटरी दीर्घकाळ टिकण्यासाठी 'हे' करा
ब्राइटनेस ठेवा कमी
ब्राइटनेस हा घटक तुमच्या मोबाइलच्या बॅटरीवर परिणाम करत असतो.बॅटरी जास्त काळ टिकवण्यासाठी ब्राइटनेस शक्यतो कमी ठेवा. स्क्रीन सेटिंग किंवा टास्क बारवर जाऊन ब्राइटनेस ऑटोमॅटीक मोडवर सेट करा.
लॉकटाइम
मोबाइलची स्क्रीन लॉक होण्याची वेळसुद्धा कमी असायला हवी. मोबाइलचा वापर झाल्यानंतर कधीकधी तो लॉक करायला विसरून जातो. अशावेळी मोबाइलची स्क्रीन ऑन राहून बॅटरी कमी होते. यासाठी स्क्रीन सेटिंग समजून घेणं गरजेचं आहे.
डार्कमोड आणि लोकेशन
डार्कमोड ऑन करण्याचे दोन फायदे असतात. पहिलं म्हणजे यामुळे बॅटरीची बचत होते. दुसरं आणि महत्वाचं म्हणजे डार्कमोडमुळे डोळ्यांना त्रास होत नाही. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक, युट्यूब, ट्विटर यांसारख्या अॅप्सना डार्कमोडची सेटिंग उपलब्ध आहे.