राष्ट्रकुल स्पर्धेचे दिवस जसजसे जवळ येत आहेत. तसतसे भारताला यावेळी पदकांची कमाई होणार का हा प्रश्न सर्वांनाच पडताना दिसत आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची कमाई करण्यासाठी भारताचे खेळाडू कंबर कसून तयार आहेत.
तर बॅडमिंटनमध्ये पदक जिंकण्यासाठी स्टार बॅडमिंटनपटू कोणतीही कसर सोडताना दिसत नाहीत
यात वैयक्तिक सुवर्णपदक जिंकण्यासाठी पीव्ही सिंधूसह स्टार बॅडमिंटनपटू तयारी करत आहेत.
यामध्ये केवळ सिंधूच नाही तर जागतिक स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदक विजेते किदाम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचाही समावेश आहे.
यामध्ये केवळ सिंधूच नाही तर जागतिक स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदक विजेते किदाम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचाही समावेश आहे.
गायत्री गोपीचंद आणि ट्रीसा जॉली यांनी एप्रिलमध्ये निवड चाचणीत अव्वल स्थान मिळवून पात्र झाले होते. मात्र गायत्री दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर आहे
अश्विनी पोनप्पा चौथ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणार असून चिराग आणि सात्विक या जोडीव्यतिरिक्त, त्यांच्या उपस्थितीतच मिश्र सांघिक स्पर्धेत भारत विजेतेपदाचा दावेदार आहे.
पुरुष एकेरीत भारताला थॉमस चषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या लक्ष्य आणि श्रीकांत यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील.