पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या निमित्ताने भारतीय खेळाडूंशी संवाद साधला.
कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये 72 देशांतील 5 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. यावेळी मोदी यांनी 'क्यों पड़े हो चक्कर में कोई नहीं है टक्कर में' असे म्हणत भारतीय खेळाडूंचा असा उत्साह वाढवला
तसेच खेळाडूंना पदक जिंकण्याचे टेन्शन घेऊ नका असेही पंतप्रधान मोदी म्हणाले, या खेळांचा आनंद घेताना त्यांनी पूर्ण समर्पण केले पाहिजे आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिरंगा फडकवण्याचे ध्येय ठेवावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होणार्या भारतीय खेळाडूंना म्हणाले, तुम्हाला काय करायचे आहे, कसे खेळायचे आहे हे सांगायची गरज नाही तुम्ही यातील तज्ज्ञ आहात. तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय खेळा. 'क्यों पड़े हो चक्कर में कोई नहीं है टक्कर में' या वृत्तीने तुम्हाला खेळावे लागेल.