नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे
मात्र दुखापतग्रस्त झाल्याने त्याला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.
यानंतर नीरजने सोशल मीडिया अकाऊंटवरून देशवासीयांची माफी मागितली आहे.
ज्यामध्ये त्याने लिहिले की, 'मला खेद वाटतो की मी बर्मिंगहॅममध्ये देशाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही.
विशेषत: उद्घाटन समारंभात भारतीय संघाचा ध्वजवाहक होण्याची संधी न मिळाल्याने मी निराश झालो आहे.
सध्या माझे संपूर्ण लक्ष परतण्यावर असेल आणि मी लवकरात लवकर मैदानात उतरण्याचा प्रयत्न करेन.
मागिल काही दिवसांत मला सर्व देशवासीयांकडून मिळालेल्या प्रेम आणि आदराबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो.
मला आशा आहे की तुम्ही सर्वजण अशाच प्रकारे माझ्याबरोबर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या खेळाडूंना पाठिंबा देत राहाल. जय हिंद.'