28 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ गेम्स सुरू होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ तिकडे गेला आहे. तर यंदा हा संघ भारतीयांच्या पदकांच्या अपेक्षा पुर्ण करेल असेही म्हटलं जात आहे.

कॉमनवेल्थ गेम्स 2010 मध्ये भारताला 101 पदके मिळाली होती. त्यामुळे यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) भारतीय खेळाडूंकडून सर्वाधिक पदकांची अपेक्षा आहे. 

2010 नंतर कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय संघाला अपेक्षित पदके प्राप्त करता आलेली नाहीत. तर ग्लासगो 2014 मध्ये भारताने 64 पदके जिंकली आणि 15 सुवर्ण, 30 रौप्य आणि 19 कांस्य जिंकत 5 वे स्थान मिळविले होते. 

तर 2018 मध्ये गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या गेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताने 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्य पदकांसह एकूण 66 पदकांसह तिसरे स्थान पटकावले होते.

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समधील भारतीय लोकांच्या आशा या गेम्ससाठी पात्र ठरलेल्या 215 हून अधिक खेळाडूंच्या खांद्यावर आहेत. मात्र याआधीच कॉमनवेल्थ गेम्समधून शूटिंग इव्हेंट्स काढून टाकल्याने भारताची जमेची बाजू कमकूवत बनली आहे. 

मात्र बॅडमिंटन, बॉक्सिंग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती हे असे 6 खेळ आहेत. ज्यात भारताला पदकांची अपेक्षा आहे

भारताने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्ससाठी नीरज चोप्रा, दुती चंद आणि हिमा दास यांचा 37 सदस्यीय ऍथलेटिक्स संघ नियुक्त केला आहे.

उंच उडीत भाग घेतल्याने तेजस्वीन शंकरसाठी भारताच्या संधी वाढू शकतात.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी