केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी देशातील रस्ते सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. आता गेल्या 9 वर्षांचा एक महत्वाचा आकडा समोर आला आहे. 

नितीन गडकरी म्हणाले, गेल्या 9 वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे भारताचे रस्त्यांचे जाळे 59% नी वाढले. भारताचा अमेरिकेनंतर जगात 2 क्रमांक.

2013-14 मध्ये 91,287 किमी च्या तुलनेत आज देशातील रस्त्यांचे जाळे सुमारे 1,45,240 किमी आहे. 

गेल्या 9 वर्षांत या काळात भारताने रस्ते बांधणीच्या क्षेत्रात सात जागतिक विक्रमही प्रस्थापित केले.

टोलमधून मिळणाऱ्या महसुलातही वाढ झाली आहे. गडकरी म्हणाले की, नऊ वर्षांत टोलचे उत्पन्नही 4,770 कोटींवरून 41,342 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 

2030 पर्यंत टोल महसूल 1.30 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा मानस आहे.

टोल वसुलीसाठी फास्टॅग प्रणालीचा वापर केल्याने टोलनाक्यांवरील वाहनांची प्रतीक्षा वेळ 47सेकंदांवर आली आहे. ही वेळ 30 सेकंदात आणण्यासाठी सरकार आणखी काही पावले उचलणार