कथावाचक जया किशोरी सध्या तीन दिवसांच्या कार्यक्रमासाठी ग्वालियार दौऱ्यावर

ग्वालियार दौऱ्यादरम्यान जया किशोरी यांनी लग्नाबद्दल केला खुलासा

जोपर्यंत लग्नाचं वृत्त माझ्या चॅनलवर प्रसारित होत नाही तोपर्यंत कोणत्याही चर्चांवर विश्वास न ठेवण्याचं केलं आवाहन

माझं लग्न जेव्हा कधी होईल, तेव्हा सर्वांना त्याची माहिती माझ्या चॅनलवरून मिळेल- जया किशोरी

याआधी जया किशोरी यांचं नाव बागेश्वर बाबा यांच्याशी जोडलं गेलं होतं

मात्र या चर्चा अफवा असल्याचं जया किशोरी यांनी केलं स्पष्ट

लग्नाबद्दल त्या म्हणाल्या होत्या, "मी साध्वी किंवा संत होणार नाही, मी लग्न करेन पण आता नाही."

आई-वडिलांपासून दूर जाऊ शकत नाही म्हणून कोलकातामध्येच लग्न करणार, जया किशोरी यांची अट