बूट किंवा चप्पल खूप घट्ट असेल तर त्वचेवर घासले जाऊन जखम होऊ शकते.

नव्या चपला किंवा बुटांमुळे त्रास होत असेल तर बचावासाठी या टिप्स फॉलो करा.

नव्या चपला घेताना त्या चांगल्या क्वॉलिटीच्या आहेत ना याची खात्री करून घ्या.

तसेच चपला विकत घेण्यापूर्वी त्या घालून चालून पहावे. पायाला आरामदायक वाटले तर त्या चपला किंवा बूट विकत घ्यावे.

पायाला चपलेमुळे जखम झाल्यास अँटीसेप्टिक क्रीम लावावे. त्याने जखम लवकर भरून आराम मिळेल.

चपलेमुळे जखम झाल्यास नारळाचे तेल लावावे, त्यानेही बरं वाटतं. चपलेच्या आतंही थोडं तेल लावावं, ती मऊ पडते.

मधामुळेही जखमा लवकर भरून येतात. त्याने वेदनाही कमी होतात.

तांदूळाचे पीठ पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा व ती जखमेवर लावा. थोड्या वेळाने कोमट पाण्याने पाय धुवावेत.

कोरफडीत अनेक गुणधर्म असतात, ज्यामुळे जखम लवकर भरते. त्याचा वापरही गुणकारी ठरतो.