चमकदार, सिल्की केस सर्वांनाच हवेसे वाटतात. त्यासाठी काही उपाय गरजेचे आहे.
दह्यामध्ये मॉयश्चरायझिंग गुणधर्म असतात. त्यात काही पदार्थ मिसळून लावल्यास चमकदार केस मिळतील.
कोरफड जेलमध्ये अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे केस मऊ, मुलायम होतात.
मधही केसांसाठी फायदेशीरच असतो. दह्यात एक चमचा मध मिसळून केसांना लावा आणि फरक पहा.
ऑलिव्ह ऑईलही औषधी असते. ते व दही लावल्यास केसांची चमक वाढते.
एका भांड्यात दही व मॅश केलेलं केळं मिक्स करा व केसांना अर्धा तास लावा. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होतो.
दह्यात लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने चमक तर वाढतेच पण कोंडाही कमी होतो.
दह्यात तुळशीची पाने मिसळून केसांना लावल्यास त्यांना पोषण मिळते व ते चमकदार होतात.