शरीरात गुड आणि बॅड असं कोलेस्ट्रॉल असते. 

मात्र बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास हार्ट ॲटॅकही येऊ शकतो. 

चुकीचं खाणंपिणं आणि खराब लाईफस्टाइलमुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढू शकते. परिणामी अनेक आजार होऊ शकतात.

काही पदार्थ खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. 

खूप तळलेले, रोस्टेड किंवा प्रक्रिया केलेले चिकन खाणे नुकसानकारक ठरू शकते.

चीज, पनीरसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे रोजचे सेवन फायदेशीर नाही. त्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते.

आरोग्यासाठी फायदेशीर असणारं अंडं हे कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढवू शकतं. ते प्रमाणातच खावं.

कोलेस्ट्रॉल लेव्हल मेंटेन ठेवण्यासाठी फळं, हिरव्या भाज्या असे हेल्दी पदार्थ खावेत.