NMACCचा शानदार उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. 

या सोहळ्यासाठी अंबानी कुटुंबियांसाह अनेक देशी-विदेशी सेलिब्रिटी उपस्थित होते.

पण अंबानी कुटुंबियांची होणारी सून राधिक मर्चंटने तिच्या लूक्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या इव्हेंटमध्ये ती एकाहून एक सरस आऊटफिट्समध्ये दिसली. 

उद्घाटन सोहळ्याच्या एका फंक्शनमध्ये राधिकाने निळ्या व पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस घातला होता. त्याची किंमत लाखाच्या घरात आहे.

वाइड नेकलाइन असलेल्या या ड्रेसमध्ये  कोर्सेट टॉप आणि मॅचिंग स्कर्ट होता, ज्यात राधिका खूप सुंदर दिसत होती.

राधिकाचे काही फोटो डिझायनर प्रबल गुरंगने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले. 

राधिकाने घातलेल्या ड्रेसप्रमाणे एका ड्रेसचा फोटो प्रबलच्या वेबसाइटवरही दिसतो, ज्याची किंमत 98 हजार रुपये आहे.

तिचा लूक पूर्ण करण्यासाठी राधिकाने या ड्रेससोबत एक हार्ट शेप पेंडंट व तसेच कानातलेही घातले होते.