बोल्डनेसच्या मर्यादा पार करणारी उर्फी जावेद फिटनेस साठी काय करते? तिचे रुटीन जाणून घेऊया.

अतरंगी स्टाइल आणि बोल्ड कपडे यामुळे उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

उर्फी दररोज वेगवेगळ्या, अतरंगी कपड्यांमध्ये दिसत असते. 

काही काळापूर्वी उर्फीने मुलाखतीत सांगितले की, पूर्वी ती खूप जाड होती. ती दररोज एक मीडियम चीज बर्स्ट पिझ्झाही खायची.

माझा चेहराही खूप जाड होता, त्यामुळे ऑडिशनमध्ये मला लीड रोल मिळत नव्हता, असेही उर्फी म्हणाली होती. 

बारीक होण्यासाठी मी आहारातून कार्ब्स आणि साखर पूर्णपणे वर्ज्य केले, असे उर्फीने सांगितले.

फिटनेससाठी ती खूप मेहनत करते. दुपारी 3-4 नंतर ती कोणताही पदार्थ खात नाही आणि फास्टिंग करते.

शरीर आतून डिटॉक्स करण्यासाठी उर्फी सकाळी उठताच कडुलिंबाचा रस पिते. 

त्याशिवाय उर्फी सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून तेही पिते.

उर्फीचे डाएट फ्लेक्सिबल आहे. तिला जे आवडते ते ती खाते.

पहा व्हिडिओ