घरगुती उपायांनी चेहऱ्यावर चमक आणण्याचा ट्रेंड खूप जुना आहे. यापैकी एक उपाय म्हणजे आइस फेशियल.
आपली त्वचा चमकदार दिसावी म्हणून लोक बऱ्याच वेळेस आइस फेशिअलची निवड करतात.
सूज कमी करण्यापासून ते फ्रेशनेस आणण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी चेहऱ्यावर बर्फ लावणे सामान्य आहे.
पण चेहऱ्याला बर्फ लावण्याचे काही तोटेही आहेत. बर्फामुळे काय नुकसान होतं ते जाणून घेऊया.
चेहऱ्यावर बर्फ थेट लावल्यास रक्तप्रवाह प्रभावित होऊ शकतो.
ज्यांना चेहऱ्यावर पिंपल्सचा त्रास आहे त्यांनी बर्फाचा वापर करणे योग्य नाही.
बर्फ जास्त वापरला तर चेहऱ्यावर लालसरपणा, पुरळही येऊ शकते.
चेहऱ्यावर बर्फ लावायचा असेल तर आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते.