कॉमेडी क्वीन भारती सिंहच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे अनेक जण आश्चर्यचकित झाले. तिने खास डाएट फॉलो करून 15 किलो वजन कमी केलं. (फोटो - इन्स्टाग्राम) 

वेट लॉससाठी भारतीने काहीही कठोर डाएट केलं नाही. तिने फक्त खाण्याची सवय आणि पद्धत बदलली.

एका मुलाखतीत भारतीने तिच्या फिटनेसबद्दल सांगितलं. ती म्हणाली मी जन्माला आले तेव्हा 4.75 किलो वजनाची होते.

भारतीला खायला खूप आवडतं, एवढं की ती (मजेत) म्हणते मी माझ्या नवऱ्याला सोडू शकते पण खाणं नाही.

म्हणूनच डाएटिंग करताना तिने पदार्थ खाणं सोडलं नाही फक्त हेल्दी डाएट फॉलो केलं.

पराठे, तूप आणि राजमा-चावल असं घरी बनवलेले पदार्थ खायला भारतीला खूप आवडतात.

भारती सिंग पंजाबमधून तूप मागवते, कणीक दळून घेते आणि भाज्याही ऑर्गॅनिक मागवते.

भारतीच्या सांगण्यानुसार ती सकाळी 10 वाजता पराठे-बटर किंवा अंड्यासह ब्लॅक टी पिते.  

वजन कमी करण्यासाठी भारतीने इंटरमिटेंट फास्टिंग केलं होतं, ज्यामध्ये  संध्याकाळी 7 नंतर ती काहीही खायची नाही.

तर दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजल्यानंतर ती जेवायची. कमी कॅलरीजच्या सेवनामुळे भारतील वजन कमी करण्यास मदत झाली.

जिममध्ये जाऊन नव्हे तर भरपूर चालून भारतीने तिचं वजन कमी केलं आहे. 

ना योगासने, ना जिममध्ये कठोर मेहनत... खाण्यावर कंट्रोल ठेऊन आणि वेळेवर जेऊनच भारतीने वेट लॉस केला आहे.