गरोदरपणात महिलांनी त्यांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
विशेषत: ड्रायफ्रुट्सचे सेवन करताना महिलांनी त्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.,
काजूमध्ये फायबर,कार्बोहायड्रेट्स, फॉस्फोरस, कॉपर, मॅग्नेशिअम, झिंक, थायमिन, मँगनीज, लोह, पोटॅशिअम व विविध व्हिटॅमिन्स असतात.
काजूमधील अनेक पोषक तत्वं गरोदरपणात खूप फायदेशीर असतात.
काजूमध्ये अनेक फॅट्स व कॅलरीज असतात. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन काजूचे सेवन करावे.
पण प्रेग्नन्सीदरम्यान किंवा त्यापूर्वी कोणतीही ॲलर्जी असेल तर नीट तपासणी करून, डॉक्टरांना विचारून मगच काजू खावेत.
गरोदरपणात काजूचे सेवन केल्याने मधुमेहाचा धोकाही कमी होतो व ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते.
गरोदर महिलांनी तळलेले किंवा भाजलेले काजू न खाता, साध्या काजूचेच सेवन करावे.
काजूमध्ये ऑक्सलेट असते, ज्याच्या सेवनाने शरीरात फ्लूइडची पातळी वाढू शकते. अधिका काजू खाल्ल्याने स्टोनचा त्रास होऊ शकतो.