धावपळीत खाण्यापिण्याकडे नीट लक्ष दिलं जात नाही. मात्र आपण जे खातो त्याचा आपल्या आरोग्यावर आणि केसांवरही परिणाम होत असतो.

आपण दररोज जे पदार्थ खातो त्यापैकी काही पदार्थ हे आपल्या केसांसाठी नुकसानकारक असतात, ज्यामुळे केसगळती वाढू शकते.

साखरयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे हे केसांच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते.

शरीरात साखरेचे जास्त प्रमाण हे केवळ डायबिटीससाठी नव्हे तर केसगळतीसाठीही कारणीभूत ठरू शकते.

जर केसांचे चांगले आरोग्य हवे असेल तर जंक फूडला राम-राम केला पाहिजे.

जंक फूडचे सेवन केल्याने लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित आजार तर होतातच पण केसही खराब होतात.

बाजारात मिळणारी कोल्ड-ड्रिंक्स, सोडायुक्त पेय ही देखील केसांसाठी हानिकारक असतात.

तुम्ही जर मद्यपान करत असाल तर आजच सावध व्हा. अल्कोहोलच्या सेवनाने केसांवर वाईट परिणाम होतो.

दारू प्यायल्याने केस कमकुवत होतात आणि वेळेआधीच गळू लागतात.