मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी हिच्या सासूबाई स्वाती पिरामल या एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत.
फार्मा क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या स्वाती, त्यांचे पती अजय पिरामल यांच्यासोबत पिरामल ग्रुपशी जोडलेल्या आहेत.
सध्या स्वाती या पिरामल ग्रुपच्या व्हाइस चेअरमन म्हणून कामकाज सांभाळतात.
वर्किंग वुमन असण्यासोबतच स्वाती या एक शास्त्रज्ञही आहेत, ज्या अनेक हेल्थकेअर इनोव्हेशन्समध्ये सहभागी झाल्या होत्या.
2012 साली भारताच्या तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी स्वाती पिरामल यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी स्वाती पिरामल यांना हा पुरस्कार देण्यात आला.
लाइफस्टाइलबाबतीत बोलायचे झाले तर स्वाती या एखाद्या सेलिब्रिटीहून कमी नाहीत.
एथनिक असो वा कॉर्पोरेट, स्वाती पिरामल या सर्व तऱ्हेचे आऊटफिट्स छान कॅरी करू शकतात.
राष्ट्रपती भवनात लाल साडी नेसलेल्या स्वाती यांचा साधेपणा सर्वांमध्येही उठून दिसत होता.
स्वाती पिरामल कुटुंबियांसह एका निवांत क्षणी