अमृता फडणवीस या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्या सातत्याने अपडेटस शेअर करत असतात.

आज संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी योगा करत असल्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

यात त्या विविध योगासनांच्या मुद्रांमध्ये दिसत आहेत. त्या त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. सर्वांनी उत्तम आरोग्यासाठी योगा करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

'तुम्ही कितीही व्यस्त असा. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असा. तन-मन निरोगी ठेवण्यासाठी एक चटई अंथरून योग करणे विसरू नका.' असे कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिले आहे.  

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने त्यांनी योग साधना करत असल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. 

योगा करतानाचे फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी योगाचे महत्व पटवून दिले आहे.