वजन घटवण्यासाठी असे पदार्थ फायदेशीर मानले ज्यामध्ये कॅलरीज कमी आणि पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असतात.

तुम्हालाही वजन कमी करायचे असेल कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांबद्दल जाणून घ्या. त्यामुळे एनर्जी तर मिळते पण चरबी वाढत नाही.

100 ग्रॅम ओव्याच्या पानांमध्ये 16 ग्रॅम कॅलरीज असतात. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, सी आणि फोलेट मुबलक प्रमाणात असते.

अर्धा कप बेरीज मध्ये केवळ 32 ग्रॅम कॅलरीज असतात. तसेच त्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी व अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात.  

100 ग्रॅम टोमॅटोमध्ये 19 कॅलरीज आढळतात. तसेच त्यामध्ये डाएट्री फायबर, पोटॅशिअम व व्हिटॅमिन सी देखील असते.

100 ग्रॅम काकडीमध्ये केवळ 15 ग्रॅम कॅलरी आणि भरपूर व्हिटॅमिन्स व मिनरल्स असतात.

100 ग्रॅम गाजरात 41 कॅलरीज असतात. त्यामधील फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.  

100 ग्रॅम मशरूम्समध्ये 38 कॅलरीज असतात. त्यामध्ये फॅट्स व कोलेस्ट्रॉल दोन्हीही नसते, वेट लॉससाठी ते खूप फायदेशीर मानले जाते.

कलिंगडाच्या 100 ग्रॅम फोडींत अवघ्या 30 कॅलरीज आढळतात. त्यामधील अनेक अँटी-ऑक्सीडेंट्स हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.