पुरेसं जेवण केल्यानंतरही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर हिमोग्लोबिनची तपासणी करणे गरजेचे ठरते.
यासाठी काही पदार्थांचे सेवन करणे अतिशय फायदेशीर ठरते.
बीटामध्ये भरपूर लोह आणि फॉलिक ॲसिड असते ज्यामुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.
अंजीरामध्ये असलेले पोषक गुणधर्म हे हिमोग्लोबिन वाढीसाठी उपयुक्त ठरतात.
तीळ हेही हिमोग्लोबिन वाढीसाठी फायदेशीर आहेत. त्यातील पोषक गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
सर्व ड्रायफ्रुट्समध्ये लोह आढळते. खजूरही त्यातीलच एक असून त्याच्या सेवनानेही बराच फायदा होता.
गाजर हे देखील आपल्या शरीरासाठी आणि रक्तवाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरते.
मनुकांमध्ये लोह, कॉपर आणि बरीच व्हिटॅमिन्स असतात. ती रक्ताच्या निर्मितीत महत्वपूर्ण भूमिका बजावतात.