केसांची नीट काळजी घेतली नाही तर ते डॅमेज होतात आणि केसगळती सुरू होऊ शकते.
हेअर केअर रूटीन फॉलो केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.
आठवड्यातून दोनवेळा केसांना तेल लावल्याने ते मजबूत व चमकदार होतात. कोमट तेलाने हलक्या हाताने केसांना मालिश करा.
आठवडयातून एकदा तरी हेअरमास्क लावल्याने केसांना फायदा होतो.
केसांना वाफ दिल्याने डीप क्लीनिंग होते व केसांचा पोत सुधारतो.
केस गळत असतील तर हीटिंग टूल्स जास्त वापरू नका, अन्यथा केसांचे नुकसान होईल.
केसांना सीरम लावल्याने ते सॉफ्ट व चमकदार होतात. मात्र ते केसांच्या मुळांना लावणे टाळावे.
एका आठवड्यात २-३ वेळा तरी केस धुवावेत. पण कोंड्याचा त्रास असेल तर एक दिवसाआड हेअरवॉश करावा.