आपली त्वचा ही शरीराचा आरसा आहे. शरीरात पोषक तत्वांची कमतरता असेल तर त्याचे परिणाम त्वचेवर दिसू लागतात.

व्हिटॅमिन सी कमी असेल तर त्याचे परिणाम चेहरा व स्किनवर दिसू लागतात.

स्किन वारंवार कोरडी पडणे ही व्हिटॅमिन सी च्या कमतरतेचेच लक्षण आहे. 

तसेच शरीरात व्हिटॅमिन सी कमी असेल तर अकाली सुरकुत्या येऊ शकतात.

त्वचेवर वारंवार रॅशेस आणि पॅचेस येणे हेही सी व्हिॅटमिनच्या कमतरतेमुळेच होते. 

तुमची जखम लवकर भरत नसेल तर तेही याचेच एक लक्षण असू शकते.

संत्रं, किवी, लिंबू, आंबट फळे ही व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत आहेत.

तसेच आवळ्यामध्येही व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्तीही खूप वाढते.