आजकाल बरेच लोक लेन्सचा वापर करतात.

काही जण गरज म्हणून तर काही फक्त फॅशनसाठी लेन्स वापरतात.

पण लेन्स लावताना व काढताना काळजी घेतली पाहिजे नाहीतर त्रास होतो.

कॉन्टॅक्ट लेन्स लावून कधीच झोपू नये, अन्यथा ॲलर्जी होऊ शकते.

अंघोळ किंवा स्वीमिंग करताना लेन्स वापरल्यास डोळ्यांचे नुकसान होऊ शकते.

बाहेर जाताना लेन्स लावल्यास चश्मा किंवा गॉगलही अवश्य सोबत घ्यावा. धुळीपासून लेन्सचे रक्षण करा.

लेन्स लावण्यापूर्वी किंवा काढण्यापूर्वी हात स्वच्छ धुतले पाहिजेत.

लेन्स नेहमीच लेन्स केसमध्ये ठेवा व त्यात पुरेसे लिक्विड ठेवा, अन्यथा त्रास होऊ शकतो.