अनेकदा आले जास्त वेळ ठेवल्यास त्यातील रस कोरडा पडतो. आले फ्रिजमध्ये ठेवणे योग्य आहे की नाही याबाबत अनेकजण संभ्रमात आहेत.
एक किंवा दोन आठवड्यात आले वापरायचे असेल तर आपण ते बाहेरच ठेवू शकता.
आले दमट ठिकाणी ठेवू नये असे केल्याने त्यात बुरशी लागू शकते. थेट सूर्यप्रकाश असलेल्या जागेऐवजी कोरड्या आणि थंड ठिकाणी आलं ठेवा.
दीर्घकाळ वापरण्यासाठी आलं फ्रीजमध्ये साठवून ठेवा. फ्रीजमध्ये ते हवाबंद कंटेनर किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलं तर जास्त काळ टिकेल आणि वाळणार नाही.
अर्धवट चिरलेले आले लगेच वापरा. चिरलेले आले लवकर खराब होते.
आले दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी ते झिप लॉक बॅगमध्ये ठेवा. या ट्रिकने आले ठेवल्याने ते बराच काळ ताजे राहते.
आले सुकले असेल तर फेकून देऊ नका. त्याची भाजून पावडर बनवा. तुम्ही ती पावडरही वापरू शकता.