भीतीदायक स्वप्ने बरेचदा आपल्या दिनचर्या, चिंता, तणाव आणि भीतीचे प्रतीक असतात. 

जर आपल्याला एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर ती आपल्या स्वप्नात दिसू शकते.

भीतीदायक स्वप्ने टाळण्याचे मार्ग 

मेडिटेशन, योगा आणि इतर सेल्फ बॅलन्सिंग activities आपल्या रुटीनमध्ये समावेश करणं गरजेचं आहे.

संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांचा समावेश असलेल्या निरोगी जीवनशैलीमुळे रात्रीची भीती टाळण्यास मदत होते.

झोपण्यापूर्वी तुमच्या मनात सकारात्मक आणि आनंदी विचार आणले तर भयानक स्वप्नांची शक्यता कमी होऊ शकते.

हे टाळण्यासाठी आपण आपल्या चिंतांना सामोरे जाण्याची आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याची गरज आहे.