पुरेसे पाणी न प्यायल्याने ओठही डिहायड्रेटेड आणि कोरडे होऊ शकतातत. काही उपायांनी ओठ मऊ होऊ शकतात. 

रात्री झोपण्यापूर्वी दुधाची साय ओठांना लावू शकतात, त्यातील मॉयश्चरायझिंग गुणधर्मामुळे ओठ मऊ होण्यास मदत होते.

दुधात गुलाबाच्या पाकळ्या घालून त्या वाटून घ्या आणि हे मिश्रम रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना लावावे.

मधात मॉयश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे ओठांना मऊ आणि मुलायम बनवू शकतात. तसेच ओठांचा कोरडेपणाही दूर होतो.

ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी खोबरेल तेलाचाही वापर करता येतो. त्याने ओठ कोमल होतात.

कोरफडीचे जेल किंवा गरामध्ये व्हिटॅमिन ई आणि  मॉयश्चरायझिंग गुण असतात, ते लावणे हे ओठांसाठी फायदेशीर असते.

बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि मॉयश्चरायझिंग गुण असतात, त्यामुळे ओठांचा कोरडेपणा दूर होण्यासे, मदत होते.