पातळ केस कोणालाच नको असतात. घनदाट आणि मजबूत केस हवे असतील तर काही टिप्स फॉलो करा.
आठवड्यात किमान दोन वेळा केस धुवा. यामुळे स्काल्प स्वच्छ राहील.
कंडीशनर लावल्याने केस हायड्रेटेड राहतात. तुम्ही होममेड किंवा केमिकल फ्री कंडीशनर वापरू शकता.
केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरू नका, त्याने केसांचे नुकसान होऊन ते कोरडे होतात.
ओले केस बांधू नका, त्यामुळे ते जास्त तुटतात. केस नैसर्गिकरित्या वाळू द्यावेत.
डोक्याला मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते व केसांची मुळं मजबूत होतात.
हेअर स्टायलिंग टूल्सचा जास्त वापर केल्याने केसांचे नुकसान होते. त्याचा जास्त वापर टाळा.