शांत, गाढ झोप लागणे आरोग्यासाठी महत्वाचे असते. त्यासाठी काही उपाय करू शकता.
स्क्रीन टाइम कमी करा. त्यामुळे लवकर व शांत झोप लागण्यास मदत होईल.
रोज झोपेची दिनचर्या पाळा, ती बदलू नका. नाहीतर झोपेत व्यत्यय येईल.
नियमित व्यायामानेही झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा होते.
झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी बिलकूल पिऊ नका. आहाराही हल्का ठेवावा.
खोलीत अंधार करून, दिवे बंद करूनच झोपावे. अन्यथा झोपेत व्यत्यय येतो.
झोपण्यापूर्वी आवडीचे पुस्तक वाचल्यास चांगली झोप येण्यास मदत होते.
दूध पिऊन झोपणे, खोलीत एअरफ्रेशनर वापरणे हे उपायही चांगल्या झोपेसाठी उपयुक्त आहेत.