फळांमध्ये अनेक पोषक तत्वं असतात, जी केस स्वस्थ व मजबूत ठेवण्यास मदत करतात.
केसगळती रोखायची असेल तर काही फळांचे नियमितपणे सेवन करणे फायदेशीर ठरते.
आवळ्यात अनेक पोषक तत्वं असतात, ज्यामुळे केस मजबूत होतात व केसगळती थांबते.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक असते, जे केसगळतीची समस्या कमी करते. हेल्दी केसांसाठी संत्री नियमित खावीत.
सफरचंदामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सीडेंट्स मुबलक असतात, जे केसांच्या वाढीसाठी मदत करतात.
केसगळतीचा त्रास असेल तर आहारात अननसाचा समावेश करावा. त्यातील अँटी-ऑक्सीडेंट्स फायदेशीर असतात.
अंजीरामध्ये अनेक पोषक तत्वं असतात, जी केसगळती रोखण्यास उपयुक्त ठरतात.
पोषक तत्वांनी युक्त असलेला खजूरही केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. त्यातील अनेक घटक हे केसगळती रोखतात.