लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही इडली पौष्टीक असा पर्याय असतो. 

पण ही इडली छान मऊ-लुसलुशीत झाली तरच ठीक. नाहीतर ती कोरडी लागते. 

इडल्या छान स्पॉंजी व्हाव्यात यासाठी काही सोप्या ट्रिक्स 

इडलीचं पीठ! थोडंसं इनो किंवा खायचा सोडा या पीठात घातलेला केव्हाही चांगला. त्यामुळे इडल्या मस्त फुलतात.

इडलीचं पीठ भिजवतानाच थोडे पोहे आणि मेथ्या घालाव्यात पोह्यामुळे इडली हलकी व्हायला मदत होते 

उडदाच्या डाळीसोबतच थोडी मूगाची डाळ घेतली तर हे पीठ हलके होते आणि इडल्या फुगतात. 

इडलीच्या पीठात थोडेसे दही घातल्यास हे पीठ जास्त चांगले आंबण्यास मदत होते.