IPL 2023 चा सीझन सचिन तेंडुलकर व मुलगा अर्जुन याच्यासाठी आत्तापर्यंत शानदार ठरला आहे.
अर्जुनने दोन वर्ष वाट पाहिल्यानंतर मुंबई इंडियन्ससाठी (MI) खेळताना IPL मध्ये पदार्पण केले.
अर्जुनने सनरायजर्स हैदराबादविरोधातील त्याच्या दुसऱ्या मॅचमध्ये IPL मधील पहिली विकेट घेतली.
अर्जुनने या मॅचमधील पहिली व शेवटची ओव्हरही टाकली. त्याचसोबत त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावाही वाचवल्या.
शेवटच्या ओव्हरमध्ये अर्जुनने भुवनेश्वर कुमारची शिकार करत विकेट घेतली आणि वडिलांचा बदला पूर्ण केला.
खरंतर, 14 वर्षांपूर्वी जानेवारी 2009 मध्ये मुंबई व उत्तर प्रदेश यांच्यात रणजीचा अंतिम सामना झाला होता.
या मॅचमध्ये भुवीने सचिनला शून्यावर बाद केले होते. तेव्हा सचिन रणजीमध्ये पहिल्यांदा शून्यावर आऊट झाला .
आता 14 वर्षांनंतर अर्जुनने आयपीएलमध्ये पदार्पण केल्यावर पहिली विकेट भुवीचीच घेतली आणि बदला पूर्ण केला.