भारतात श्रीमंत लोकांची यादी सतत वाढतच आहे. 2023 साली देशामध्ये 16 नवे अब्जाधीश फोर्ब्सच्या लिस्टमध्ये सामील झाले आहेत.
देशात सर्वात जास्त श्रीमंत लोकांची घरं मायानगरी मुंबईत आहेत. इथे जवळपास 50 अब्जाधीश राहतात.
अंबानी यांच्यापासून ते टाटांपर्यंत या सर्वांच्या संपत्तीची जेवढी चर्चा होते, तेवढीच चर्चेत त्यांची घरही असतात.
भारतातील सर्वात महाग घरांमध्ये पहिला नंबर मुकेश अंबानी यांच्या 27 मजली Antilia चा नंबर लागतो, त्याची किंमत सुमारे 12,000 कोटी रुपये आहे.
दुसऱ्या क्रमांकावर उद्योगपती गौतम सिंघानिया यांचे JK House आहे. ज्याची किंमत सुमारे 6,000 कोटी रुपये इतकी आहे.
देशातील महाग घरांपैकी तिसऱ्या क्रमाकांवर अनिल अंबानी यांचे Abode हे घर आहे, जे सुमारे 5,000 कोटी रुपयांचे आहे.
या यादीत चौथ्या स्थानावर आहे सायरस पूनावाला यांच्या Linoln house चा समावेश आहे, जे सुमारे 750 कोटी रुपयांचे आहे.
पाचव्या स्थानावर कुमार मंगलम बिर्ला यांचे Jatia House येतं, ज्याची अंदाजे किंमत 425 कोटींच्या आसपास आहे.
देशातील महाग घरांच्या लिस्टमध्ये अमिताभ बच्चन यांच्यापासून शाहरूख खानच्या घराचाही समावेश आहे.
अभिनेता शाहरूख खानचा मन्नत हा प्रसिद्ध बंगला सुमारे 200 कोटी रुपये किमतीचा आहे, असे समजते.
तर बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचा जलसा हा बंगला सुमारे 120 कोटी रुपये किमतीचा आहे.