आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानींचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या NMACCचे स्वप्न 31 मार्चला अखेर प्रत्यक्षात उतरलं.
तीन दिवसांच्या ओपनिंग सेरेमनीसाठी देश-विदेशातील अनेक दिग्गजांनी, सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.
'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'ची सुरुवात जरी आत्ता झाली असली तरी नीता अंबानी यांनी वयाच्या 6 व्या वर्षीच हे स्वप्न पाहिलं होतं.
वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चरसह सुरु झालेलं हे सेंटर भारतीय कलेला एक मोठा व ग्लोबल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरेल
' कला माझ्यासाठी एक साधना व तपश्चर्येसारखी आहे' असे सांगत नीता अंबानी यांनी हे कल्चरल सेंटर आपलं ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं नमूद केलं.
मी 6 वर्षांची होते तेव्हा भरतनाट्यम शिकण्याचा निर्णय घेतला. या कलेने माझा आत्मविश्वास वाढवला. आज मी जी काही आहे, त्यात या कलेचा महत्वाचा भाग आहे.
भारतीय कलेचा सुगंध जगभरात पोहोचावा, असं माझं स्वप्न होतं. माझ्या बालपणीचं स्वप्न NMACC ने पूर्ण केलं, असही नीता अंबानी यांनी सांगितलं.
' आम्ही आईला बिझनेस वुमन, खेळांना प्रोत्साहन देणारी लीडर, रिलायन्स फाऊंडेशनची चेअरपर्सन आणि एका शिक्षिकेच्या स्वरूपात पाहिलं आहे,' असं ईशा अंबानीने नमूद केलं.
' मात्र या सर्वांपेक्षाही आधीपासून माझी आई एक भरतनाट्यम् डान्सर आहे आणि गेल्या 50 वर्षांत तिने दररोज ही साधना केली आहे' असेही ईशाने सांगितलं.
हे कल्चरल सेंटर लहान मुलं, विद्यार्थी आणि वृद्ध व्यक्तींसाठी विनामूल्य आहे. अन्य लोकांसाठी याच्या तिकीटाची किंमत 199 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे.
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर हे मुंबईतील वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC)येथील Jio world centre येथे बनले असून ते 5 भागांत विभागलेले आहे.