भारतीय उद्योगपती व आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानींचे अँटिलिया निवासस्थान तुम्ही पाहिले असेलच.
पण अंबानी यांचा दुबईतील बंगला तुम्ही पाहिला आहे का ? तो एखाद्या राजमहालापेक्षा कमी नाही.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे हे घर दुबईतील पाम जुमेराह बीचवर स्थित आहे.
माहितीनुसार, या निवासस्थानाची किंमत 80 मिलियन डॉलर्स इतकी आहे.
गेल्या वर्षी अनंत अंबानी यांच्यासाठी मुकेश अंबानी यांनी हे घर खरेदी केले.
हा दुबईतील सर्वात महागड्या निवासी सौद्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
यामध्ये 10 लग्झरी बेडरुम्स, एक स्पा, इनडोअर व आऊटडोअर पूल यासह अनेक 5 स्टार सुविधा उपलब्ध आहेत.
अभिनेता शाहरूख खान आणि फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम यांचाही येथे बंगला असून ते अंबानी यांचे शेजारी आहेत.
यापूर्वी मुकेश अंबानी यांनी त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याच्यासाठी युकेमध्ये एक हवेली विकत घेतली होती.
मुकेश अंबानी यांचे नेटवर्थ 77 अब्ज डॉलर्स असून ते अब्जाधीशांच्या यादीत 12 व्या स्थानी आहेत.