रिलायन्स उद्योग समुहाच्या संचालक मंडळात मोठे बदल करण्यात आले. आता नवीन पिढीकडे जबाबदारी दिली आहे.

नवीन संचालक मंडळात आकाश, अनंत आणि ईशा अंबानी यांचा समावेश केला गेला आहे.  या तिघांना नवीन जबाबदारी दिली आहे. 

आकाश, अनंत आणि ईशा यांना कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्याची घोषणा करण्यात आली. सोमवारी ही घोषणा झाली.

रिलायन्स उद्योग समूहाची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत ही माहिती दिली गेली. आता नीता अंबानी यांना बोर्डाच्या बाहेर ठेवले आहे.

रिलायन्स समूहाचे चेअरमन म्हणून मुकेश अंबानी कायम राहणार आहेत. मुकेश अंबानी रिलायन्स जिओचे मालक आहेत. 

नीता अंबानी संचालक मंडळात नसणार आहे. परंतु त्या रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षपदी असणार आहेत. 

रिलायन्स समूहाचे चेअरमन म्हणून मुकेश अंबानी कायम राहणार आहेत. मुकेश अंबानी रिलायन्स जिओचे मालक आहेत. 

मुकेश अंबानी यांच्या कन्या ईशा यांच्याकडे रिलायन्स रिटेलची सूत्र असणार आहेत. अनंत हे एनर्जी बिझनेस सांभाळत आहेत.