बळीराजासाठी आनंदाची बातमी! या धरणातून सोडणार 1500 क्युसेकने पाणी, 25 जुलैपर्यंत विसर्ग राहणार सुरू
आता वारी सुरू झाली आहे. ती याच महिन्यात पंढपुरात दाखल होईल त्यामुळे त्यांच्या स्नानासाठी नदीच पाणी नाही अशी अवस्था चंद्रभागेची झाली आहे.
सोलापूर : राज्यात उष्णतेचा कहर वाढत आहे. तर शेतीला पाणी मिळत नसल्याने तर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यातच आता वारी सुरू झाली आहे. ती याच महिन्यात पंढपुरात दाखल होईल त्यामुळे त्यांच्या स्नानासाठी नदीच पाणी नाही अशी अवस्था चंद्रभागेची झाली आहे. त्यामुळे आता पंढरपुरच्या आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी माढा तालुक्यातील उजनी धरणातून चंद्रभागा नदीत बुधवारी सकाळी 9 वाजता 1500 क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडले जाणार आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल आहे. आज दिवसभरात एकूण 4500 क्युसेक्सने 4 गाळ मोरीतुन पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे चंद्रभागेच्या काठावरूल शेतकऱ्यासह भागातील शेतकरी आनंदात आहे.
Published on: Jun 21, 2023 10:46 AM