कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; धाराशिवमध्ये महाविकास आघाडी विरूद्ध महायुती लढत

| Updated on: Apr 28, 2023 | 11:50 AM

Agricultural Produce Market Committee Election 2023 : धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, पाहा व्हीडिओ...

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील 8 बाजार समितीसाठी निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. यात प्रत्येकी 18 संचालक मंडळ अश्या 144 जागांसाठी 327 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर 13 हजार 581 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ लढत होत आहे. तुळजापूर, धाराशिव, कळंब व भुम परंडा, उमरगा या ठिकाणी प्रतिषठेची लढत होत आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट खासदार ओमराजे निंबाळकर , ठाकरे गट आमदार कैलास पाटील , माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील माजी मंत्री काँग्रेस नेते मधुकरराव चव्हाण , माजी मंत्री बसवराज पाटील , माजी आमदार राहुल मोटे या महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. तर महायुतीच्या पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत , शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील , माजी खासदार रवींद्र गायकवाड , माजी आमदार सुजितसिंह ठाकूर या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Published on: Apr 28, 2023 11:50 AM