Income Tax : डेडलाईन संपली, मग भरताय इनकम टॅक्स रिटर्न? असं होऊ शकतं नुकसान

Income Tax : अंतिम मुदतीनंतर प्राप्तिकर रिटर्न भरला तर काय मोठा फरक पडतो? विलंब शुल्क भरले की झाले, असा काहींचा समज आहे. पण तपशीलात गेलात की नुकसानीचा अंदाज तुम्हाला लक्षात येईल.

Income Tax : डेडलाईन संपली, मग भरताय इनकम टॅक्स रिटर्न? असं होऊ शकतं नुकसान
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 10:15 AM

नवी दिल्ली | 20 जुलै 2023 : या आर्थिक वर्ष 2022-23 साठी इनकम टॅक्स रिटर्न दाखल (ITR Filing) करण्याची अंतिम मुदत आता तोंडावर आली आहे. प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. म्हणजे साधारणतः तुमच्या हातात 10 दिवस उरले आहेत. अनेक करदात्यांनी (Taxpayers) आयटीआर फाईल करुन त्यांचे कर्तव्य बजावले आहे. तर काहींना अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. त्यांना कामातून सवड मिळत नाही. त्यांना आळस सोडवत नाही. तसेच काहींना अंतिम मुदतीनंतर प्राप्तिकर रिटर्न भरला तर काय मोठा फरक पडतो? विलंब शुल्क भरले की झाले, असा काहींचा समज आहे. पण अंतिम मुदतीनंतर, डेडलाईननंतर आयटीआर भरला तर केवळ दंडच भरावा लागत नाही तर अनेक बाबतीत नुकसान होते.

मुदत वाढणार नाही

गेल्यावर्षीपेक्षा यंदा आयटीआर दाखल करण्याचे प्रमाण अधिक असू शकते. तसेच आयटीआर भरण्याची प्रक्रिया सुटसूटीत आणि सोपी करण्यात आली आहे. शेवटच्या दिवसाची वाट न पाहता तात्काळ करदात्यांनी आयटीआर भरण्याचे आवाहन त्यांनी केले. आयटीआर भरण्यासाठी अर्थ मंत्रालय कोणती पण मुदतवाढ देणार नसल्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

नियम म्हणणे काय?

आयटीआर अंतिम मुदतीपूर्वी अथवा अंतिम तारखेला भरणे आवश्यक आहे. नाही तर करदात्याला भूर्दंड बसतो. करदात्यांना अनेक प्रकारच्या लाभापासून वंचित रहावे लागते. अंतिम मुदतीनंतर आयटीआर भरणाऱ्यांना दंड भरावा लागतो. काही प्रकरणात तुरुंगाची हवा पण खावी लागू शकते. आयटीआर फाईल करण्यासंबंधी प्राप्तिकर खात्याचे नियम आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचा फटका बसतो.

डेडलाईन नंतर ITR फाईलिंगचे नुकसान

  1. करदाता अंतिम मुदतीपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्यात अपयशी ठरला तर त्याला बिलेटेड रिटर्न भरता येते. पण त्याला नुकसान भरपाई (मालमत्ता नुकसान वगळता) पुढील वर्षात कॅरी फॉरवर्ड करता येत नाही. नुकसान पुढील 8 वर्षांपर्यंत कॅरी फॉरवर्ड करता येते.
  2. निश्चित कालावधीत ITR फाईल केल्यावर करदात्याला रिफंड राशीवर 0.5 टक्क्यांनी दर महिन्याला व्याज मिळते. करदात्याने 31 जुलैपूर्वी रिटर्न फाईल केले तर त्याला जोपर्यंत रिफंड देण्यात येणार नाही तोपर्यंत एप्रिल महिन्यापासून व्याज मिळेल. पण करदात्याने सप्टेंबर महिन्यात रिटर्न फाईल केले तर त्याला रिफंडवर दोन महिन्यांचे व्याज मिळणार नाही.
  3. बिलेटेड आयटीआर फाईल करताना कराचा भरणा बाकी असेल तर दंडावर व्याज (Penal Interest) आकारण्यात येते. कर थकला असेल तर नियम 234A, 234B आणि 234C अंतर्गत दंडासहीत व्याज द्यावे लागेल.
  4. 31 जुलै पूर्वी सेल्फ-असेसमेंट कराचा भरणा केला नाही तर नियम 234A अंतर्गत दंड द्यावा लागेल. तर 31 मार्च पूर्वी Advance Tax ची 90 रक्कम भरणे जमले नाही तर नियम 234B अंतर्गत दंड द्यावा लागेल. दर महिन्याला 1 टक्के या दराने दंडासह व्याज आकारण्यात येईल.
  5. बिलेटेड रिटर्न भरल्यास रिफंडसाठी ताटकाळावे लागेल. तुम्हाला टॅक्स रिफंड, व्हेरिफिकेशनची, पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मिळेल .आयटीआर फाईलिंगमधील उशीर झाल्यावर रिफंड पण उशीरा मिळेल.
  6. बिलेटेड रिटर्न भरण्यात काही गडबड आढळल्यास करदात्याला बिलेटेड आयटीआर पुन्हा दुरुस्त करता येईल. पण त्यानंतरही आयकर खात्याला संशय आला तर करदात्याला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.