Big Update : नाहीतर होईल डोक्याला ताप! उरकून घ्या ही कामे आताच

Big Update : मे महिन्यात संपत आला आहे. जून महिना सुरु होईल. या महिन्यात तुम्ही हे कार्य लवकर पूर्ण केले नाही तर तुमच्या डोक्याला ताप होईल.

Big Update : नाहीतर होईल डोक्याला ताप! उरकून घ्या ही कामे आताच
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 12:10 PM

नवी दिल्ली : जून महिन्या सुरु व्हायला आता काही दिवस उरले आहेत. या महिन्यात तुम्हाला आर्थिक विषयाशी संबंधित कामे लवकर उरकून घ्यावी लागतील. ही कामे पूर्ण करण्यासाठी जून महिना डेडलाईन आहे. ही अंतिम मुदत तुम्ही ओलांडली, त्या अगोदर कामे पूर्ण केली नाही तर तुम्हाला आर्थिक भूर्दंडच (Penalty) नाही तर मनस्ताप पण सहन करावा लागेल. या कामांमध्ये पॅन-आधार कार्ड जोडणी (Pan-Aadhaar Linking) , EPFO संबंधीची कामे, एफडी विषयाची कामे, नि: शुल्क आधार अपडेट डेडलाइन (Deadline) असल्याने हे काम पूर्ण करावे लागेल.

पॅन-आधार लिकिंग डेडलाईन पॅन (PAN) आणि आधार (Aadhaar) जोडणीचे काम जून महिन्यातच पूर्ण करावे लागेल. ही आता शेवटची संधी आहे. 30 जून, 2023 पर्यंत ही मुदत आहे. CBDT ने याविषयी एक प्रेस नोट जारी केली. त्यानुसार, यापूर्वी अनेक संधी देण्यात आला. आता पॅन-आधार कार्ड जोडणीची ही शेवटची संधी देण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत ही लिकिंग न केल्यास तुमेच पॅन कार्ड निष्क्रिय होईल.

जादा पेन्शनसाठीचा अर्ज EPFO ने जादा पेन्शन मिळविण्यासाठी पर्याय निवडीची अंतिम मुदत वाढवली आहे. 26 जून 2023 रोजीपर्यंत ही मुदत वाढ देण्यात आली आहे. ईपीएफओच्या परिपत्रकानुसार, ज्या कर्मचाऱ्यांनी 5,000 रुपये ते 6500 रुपये या दरम्यान वेतन मर्यादेपेक्षा अधिक वेतनात योगदान दिले होते. आणि EPS-95 सदस्यांना सुधारीत योजनेत EPS अंतर्गत पर्याय निवडला, ते या हायर पेन्शनसाठी, जास्तीच्या निवृत्ती वेतनासाठी पात्र असतील. पात्र सदस्यांना त्यांच्या नियोक्त्यासह, संयुक्त पद्धतीने यासंबंधीचा अर्ज आणि इतर कागदपत्रे देऊन योजनेत सहभागी होता येते. आतापर्यंत 12 लाख कर्मचाऱ्यांनी याचा फायदा घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

इंडियन बँकेची विशेष एफडी इंडियन बँकेने IND SUPER 400 DAYS स्पेशल एफडी सुरु केली आहे. गुंतवणूकदारांसाठी या मुदत ठेवीची अंतिम मुदत 30 जून, 2023 रोजीपर्यंत वाढविण्यात आली आहे. इंडियन बँक सर्वसामान्य ग्राहकांसाठी 7.25 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 टक्के आणि अतिज्येष्ठ नागरिकांसाठी 8.00 टक्के व्याज देण्यात येणार आहे.

SBI अमृत कलश देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी भारतीय स्टेट बँकेने (SBI) अमृत कलश (Amrit Kalash) स्पेशल फिक्स्ड डिपॉजिट (FD) स्कीमला मुदत वाढ दिली. बँकेने रिटेल टर्म डिपॉझिट प्रोग्राम सुरु केला होता. 15 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च, 2023 पर्यंत ती वैध होती. आता एसबीआयने FD रिटेल टर्म डिपॉझिट प्रोग्राम 30 जून 2023 पर्यंत वाढविला आहे.

निःशुल्क आधार अपडेट नागरिकांना आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update) करण्याची मोफत संधी आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांना ही सवलत दिली आहे. त्यानुसार, आधार कार्डमधील काही माहिती अपडेट करण्यासाठी मोफत संधी देण्यात आली आहे. आता ऑनलाईन आधार कार्ड अपडेटसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. ही सेवा myAadhaar पोर्टल वर मोफत आहे. तर आधार केंद्रावर 50 रुपये शुल्क द्यावे लागेल.

बँक लॉकर कराराची अंतिम मुदत भारतीय रिझर्व्ह बँकेने(RBI) बँकांना लॉकर करार नुतनीकरणाची अंतिम मुदत वाढवली होती. पूर्वी ही अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंत होती. आता ती वाढवून 30 जून करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.