नवी दिल्ली : देशातील ग्राहकांना शुद्ध सोने खरेदी करता यावे. त्यांची फसवणूक टळावी यासाठी सोन्याच्या हॉलमार्किंगचा (Gold Hallmarking) नियम आला. केंद्र सरकारने हा नियम लागू केला. देशभरात 1 एप्रिल 2023 पासून हा नियम लागू झाला. देशातील सोन्या,चांदीचे दुकानदार, सराफा, पेढीवाले यांना HUID Hallmarking चे दागिने, आभुषण विक्री करणे अनिवार्य करण्यात आले. जुने दागिने विक्री करण्यासाठी ते अगोदर हॉलमार्क करुन नंतरच विक्री करण्याचा नियम आला. पण आता 4 अंकी HUID चालणार नाही, काय बदल झाला ते घ्या जाणून…
बदलला सोने खरेदीचा नियम
केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्क नियमांमध्ये बदल केला आहे. केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून 4 अंकांचे हॉलमार्क युनिक आयडी समाप्त केले आहेत. आता 1 एप्रिलपासून 4 अंकांच्या हॉलमार्क दागिन्यांची विक्री करता येणार नाही. त्यामुळे हॉलमार्कचे दागिने खरेदी करताना आता 4 अंकांच्या नव्हे तर 6 अंकी हॉलमार्क बघूनच दागिने खरेदी करणे आवश्यक आहे.
म्हणून हा हॉलमार्क पूर्णपणे बंद
आतापर्यंत दोन प्रकारचे हॉलमार्क सुरु होते. एक 4 अंकी तर दुसरा 6 अंकांचा हॉलमार्क सुरु होता. पण त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम होत होता. शुद्ध सोन्यासाठी दोन हॉलमार्कची गरज नसल्याने सरकारने त्यातील एक, 4 अंकांचा हॉलमार्क पूर्णपणे बंद केला. आता केवळ 6 अंकी हॉलमार्कचा वापर करण्यात येत आहे.
हॉलमार्क क्रमांक अनिवार्य
ग्राहक मंत्रालयाने शुक्रवारी सोने आणि दागिन्यांच्या खरेदी विक्रीसाठी नियमात बदल केला आहे. 1 एप्रिलपासून हॉलमार्क क्रमांकाशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही. नवीन नियमानुसार, 31 मार्च, 2023 नंतर चार अंकी हॉलमार्क युनिक ऑयडेंटिफिकेशन (HUID) आभुषणे आणि दागिने खरेदी-विक्री करता येणार नाही. 1 एप्रिलपासून सहा आकडी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग दागिनेच मान्य राहतील.
काय आहे हॉलमार्किंग