Car Insurance : पावसाळ्यात वाहन विम्यात करा असा बदल, कारचे नाही राहणार कोणतेच टेन्शन

Car Insurance : पावसाळ्यात वाहन विमा घेऊन भागत नाही. त्यासोबत हे एड-ऑन घेतले तर वाहन मालकाला मोठा फायदा मिळतो. त्याला नुकसान भरपाईचा दावा करता येतो. कोणते आहेत हे एड-ऑन? काय होतो त्याचा फायदा

Car Insurance : पावसाळ्यात वाहन विम्यात करा असा बदल, कारचे नाही राहणार कोणतेच टेन्शन
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 5:34 PM

नवी दिल्ली | 21 जुलै 2023 : पावसाने अगोदर उत्तर भारताला झोडपून काढले. त्यानंतर आता मध्य आणि पश्चिमी भारताला मान्सूनचा फटका बसला आहे. अनेक कार कागदाप्रमाणे मोठंमोठ्या नद्यांमध्ये वाहून गेल्या. तर रस्त्याच्या कडेला असलेल्या कार गाळात फसल्या. काही वाहनांवर झाड कोसळले.  पावसाळ्यात साध्या वाहन विमावर भागत नाही. मुसळधार पाऊस, पाणी साचल्याने आणि वादळाचा फटका बसल्यास साध्या विम्यात नुकसान भरपाईची तरतूद नसते. कारचे नुकसान झाल्यास दुरुस्तीसाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे अशा संकटावेळी एड-ऑन घेतले तर वाहनाच्या नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करता येतो. पावसाळ्यात विमा योजनेत खास एड ऑन (Add-On Covers for Car Insurance) असणे फायद्याचे ठरते.

हे एड-ऑन असतील तर लाईफ झिंगालाला

इंजिन सुरक्षा कव्हर (Engine Protection Cover)

हे सुद्धा वाचा

इंजिन हे वाहनाचे काळीज असते. इंजिनाचे नुकसान झाले तर मोठा खर्च येतो. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. नदी फुटून शहरात पाणी आले तर वाहनं त्यात बुडतात. इंजिन दुरुस्तीचा मोठा खर्च येतो. इतका खर्च करणे मध्यमवर्गाच्या आवाक्या बाहेर असते. अशावेळी इंजिन सुरक्षेसाठी एड-ऑनचा पर्याय निवडता येतो. यामुळे डागडुजी, दुरुस्तीचा खर्च मिळतो.

झिरो डेप्रिसिएशन कव्हर (Zero Dep. Cover)

कारचे किती नुकसान झाले हे निश्चित करण्यासाठी, नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करण्यासाठी डेप्रिसिएशनची भूमिका महत्वपूर्ण आहे. पावसाळ्यात अधिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी तुम्ही डेप्रिसिएशन एड-ऑनचा विचार करु शकता. हे एड-ऑन ट्यूब, बॅटरी आणि बॅटरी सोडून इतर पार्टसाठी मिळते.

24×7 रोड साईड असिस्‍टेंस (Road Side Assistance)

अनेकदा मुसळधार पावसामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. अशावेळी कार बाहेर काढणे आवश्यक असते. 24×7 रोड साईड असिस्‍टेंस हा पर्याय एड-ऑनमध्ये निवडता येतो. यामुळे टोईंग, जागेवरच दुरुस्ती, इंधनाची गरज अशा गोष्टींची पूर्तता करण्यात येते.

रिटर्न टू इनवॉइस (Return To Invoice)

वाहनांचे मोठे नुकसान झाल्यास हे एड ऑन उपयोगी येते. वाहन दुरुस्त होत नसेल अथवा दुरुस्तीसाठी विमा रक्कमेपेक्षा अधिक खर्च येत असल्यास हे एड ऑन फायद्याचे ठरते. रिटर्न टू इनवॉइसमुळे वाहन मालकाला मोठी मदत मिळते.

दावा प्रक्रिया काय

पावसाळ्यात वाहना क्षतिग्रस्त झाले. त्याचे नुकसान झाले तर वाहन मालकाने याविषयीची माहिती लागलीच विमा कंपनीला द्यावी. त्यामुळे क्लेम फाईल करण्यास उशीर होत नाही. फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून क्लेम प्रक्रिया सोपी होते. कार विमा दावा झटपट मार्गी लावण्यासाठी कागदपत्रे अगोदरच तयार असणे आवश्यक आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.