Account Balance | SBI, HDFC, ICICI Bank ग्राहकांसाठी महत्त्वाचे, दंड म्हणून कापली जाणारी रक्कम वाचवा
Account Balance | प्रत्येक बँकेच्या खात्यात कमीतकमी शिल्लकी(Minimum Balance) ठेवावे लागते. आपण SBI, ICICI आणि HDFC या बँकेत मिनिमम बॅलन्स किती ठेवावे लागेल ते पाहुयात..
Account Balance | बचत खात्यावर(Saving Account) बँका सेवा सुविधा देतात. तर कमीत कमी बॅलन्सचा (Minimum Balance) नियमही लागू करतात. खात्यात ठराविक रक्कम ठेवावी लागते. त्यासाठी बँका बचत खात्याला मर्यादा घालून देतात. म्हणजेच प्रत्येक बँक एक ठराविक मर्यादा (Limit) निश्चित करते. तेवढी रक्कम त्या खात्यात ठेवावी लागते. जर ही मर्यादा पाळली नाही. रक्कम मर्यादेच्या खाली आली तर खातेदाराला दंड (Penalty) द्यावा लागतो.
प्रत्येक बँकेचा नियम वेगळा
मिनिमम बॅलेन्स किती ठेवायचे यासंबंधी प्रत्येक बँकेचा नियम वेगळा आहे. काही बँकांची शिल्लक रक्कमेची ही मर्यादा एकसारखी असते. तर काही बँकांची वेगळी. आपण SBI, ICICI आणि HDFC बँकेत कमीतकमी किती शिल्लक रक्कम ठेवावी लागते ते पाहुयात…
SBI खातेदारांना किती रक्कम ठेवणे आवश्यक
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बचत खात्यात किती शिल्लक रक्कम ठेवायची हे विभागावर ठरते. म्हणजे ग्रामीण क्षेत्रासाठी शिल्लक रक्कमेची मर्यादा 1,000 रुपये आहे. तर निम्नशहरांतील ग्राहकांना 2,000 रुपये खात्यात ठेवावे लागतात. तर मेट्रो शहरातील ग्राहकांना खात्यात कमीतकमी 3,000 रुपये ठेवणे आवश्यक आहे.
HDFC Bank चा नियम काय सांगतो
खासगी क्षेत्रातील या मोठ्या बँकेसाठी कमीत कमी किती बॅलन्स ठेवावे लागते हे तुम्ही राहत असलेल्या ठिकाणाहून ठरते. मोठ्या शहरात राहत असला तर खात्यात कमीत कमी 10,000 रुपये बॅलन्स ठेवावे लागेल. निम्न शहरांसाठी 5,000 रुपये आणि ग्रामीण भागातील शाखांसाठी 2,500 रुपये बॅलन्स ठेवावे लागेल.
ICICI Bank मध्ये किती मर्यादा
ICICI Bank मध्ये एचडीएफसी बँकेप्रमाणेच खात्यातील रक्कमेचा नियम आहे. शहरी भागासाठी 10,000 रुपये, निम्न शहरी भागासाठी 5,000 रुपये तर ग्रामीण भागासाठी 2,500 रुपये बॅलन्स ठेवावे लागेल.
पण या खात्यात कमीत कमी शिल्लक रक्कम नसली तरी काहीच दंड लागत नाही.
प्रधानमंत्री जनधन योजना खाते बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट खाते निवृत्तीधारकांचे बचत खाते वेतन खाते लहान मुलांचे बचत खाते