iPhone 15 लाँचिंगपूर्वी आयफोन 13 आणि 14 मिळतोय स्वस्तात, कसं ते जाणून घ्या

| Updated on: Aug 24, 2023 | 8:57 PM

iPhone Discount: अॅपल कंपनी आपल्या आयफोन सीरिज आतापर्यंत सप्टेंबर महिन्यात लाँच करत आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता अवघे काही दिवस असताना आयफोन 13 आणि 14 वर डिस्काउंट मिळत आहे.

iPhone 15 लाँचिंगपूर्वी आयफोन 13 आणि 14 मिळतोय स्वस्तात, कसं ते जाणून घ्या
iPhone 15 लाँचिंगसाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना आयफोन 13 आणि 14 वर भारी डिस्काउंट, असा घ्याल फायदा
Follow us on

मुंबई : आयफोनची क्रेझ मोबाईलप्रेमींमध्ये कायम आहे. दरवर्षी ॲपल आपल्या नवीन फोनची सीरिज सप्टेंबर महिन्यात लाँच करते. यंदा आयफोन 15 सीरिज लाँच केली जाणार आहे. तारीख जाहीर केली नसली तरी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी हा फोन लाँच केला जाऊ शकतो. तत्पूर्वी आयफोन 13 आणि आयफोन 14 स्वस्तात घेण्याची संधी मोबाईलप्रेमींना चालून आली आहे. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मोबाईल खरेदी करू शकता. इ कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर आयफोन 13 आणि आयफोन 14 वर मोठी सवलत मिळत आहे. या व्यतिरिक्त तुम्ही एक्स्चेंज ऑफर आणि बँक डिस्काउंटचा फायदा घेता येणार आहे.

Apple iPhone 14: फ्लिपकार्ट डील

आयफोन 14 विकत घ्यायची इच्छा असेल तर तुम्हाला फ्लिपकार्टवर 16 टक्के डिस्काउंटसह फक्त 66,999 रुपयांना हा फोन मिळेल. जर तुम्ही या फोनवर एक्स्चेंज ऑफर घेतली तर हा फोन फक्त तुम्हाला 60 हजार रुपयात मिळू शकतो.

Apple iPhone 14 अमेझॉन डिस्काउंट

अमेझॉनवर आयफोन 14 वर 15 टक्के सवलत देण्यात आली आहे. हा फोन तुम्हाला 67,999 रुपयांना मिळेल. एक्स्चेंज ऑफरसह हा फोन तुम्हाला 61,050 रुपये मिळू शकते. या व्यतिरिक्त काही बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास कॅशबॅक ऑफर मिळू शकते.

Apple iPhone 13 अमेझॉन डिस्काउंट

आयफोन 13 मूळ किंमत 69900 रुपये आहे. मात्र हा फोन तुम्हाला अमेझॉनवर 14 टक्के डिस्काउंटसह फक्त 59,999 हजार रुपयांना मिळेल. एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्ही हा फोन 42,050 रुपयांना खरेदी करू शकता.

Apple iPhone 13 फ्लिपकार्ट डील

आयफोन 13 हा फोन फ्लिपकार्टवर 59999 रुपयांना मिळत आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये हा फोन तुम्हाला 55000 रुपयांना मिळू शकतो. जर एक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केलं तर 5 टक्के डिस्काउंट मिळेल.

एक्स्चेंज ऑफर ही पूर्णत: फोनच्या कंडिशनवर अवलंबून आहे. जुन्या फोनची बॅटरी, मॉडेल यावर सर्वकाही अवलंबून आहे. जर जुना फोन या सर्व पातळ्यांवर पात्र ठरला तर पूर्ण एक्स्चेंज ऑफर मिळू शकते.