मुंबई : मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स दरम्यान आयपीएल 2023चा पहिला सामना पार पडला. हा सामना अत्यंत रोमांचक ठरला. या सामन्यात लखनऊचा पेसर नवीन उल हकने मुंबई टीमचा कर्णधार रोहित शर्माला बाद केलं. रोहित शर्माला बाद केल्यानंतर त्याने अत्यंत वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं. नवीनने कानाला हात लावून आपला आनंद व्यक्त केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रोहित शर्मा या सामन्यात सुपर फ्लॉप झाल्यामुळे नवीनने हा जल्लोष केल्याचं सांगितलं जात आहे.
कालच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा सुपर फ्लॉप ठरला. रोहितने फक्त 11 धावा केल्या. या सीजनमध्ये 14 लीग आणि एक एलिमिनेटरचा सामना मिळून त्याने फक्त 324 धावा केल्या आहेत. तर नॉक आऊट परफॉर्मन्सवर तो सुपर फ्लॉप ठरला आहे. रोहित शर्माला बाद केल्यानंतर नवीनने प्रचंड जल्लोष केला. त्याचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहे. फोटोत रोहित शर्मा वैतागून बॅट आपटत जाताना दिसत आहे. तर दुसरीकडे त्याच्याच पाठी उभा असलेला नवीन डोळे बंद करून कानाला हात लावून उभा असलेला दिसत आहे. हा फोटो सर्वात हिट ठरला आहे.
दरम्यान, सलग दोन सामन्यात पराभूत होऊन मुंबई इंडियन्सची या सीजनमध्ये सुरुवात झाली होती. त्यातच जसप्रीत बुमराह संघात नव्हता. तर जोफ्रा आर्चर सारखा बिनीचा गोलंदाजही पूर्णपणे फिट नव्हता. अर्ध्या सीजनमधूनच त्याला संघातून बाहेर पडावं लागलं होतं. त्यामुळे मुंबई प्लेऑफ पर्यंत जाईल की नाही याची शाश्वती नव्हती. तर लखनऊचा संघ सलग दुसऱ्या सीजनमध्ये एलिमिनेटरमध्ये बाहेर पडली आहे.
Afghan breakthrough!
Naveen gets the big wicket of Rohit Sharma in the #TATAIPL #Eliminator ?#LSGvMI #IPLonJioCinema #IPL2023 pic.twitter.com/vFl43ZPSuW
— JioCinema (@JioCinema) May 24, 2023
कालच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून आधी फलंदाजी घेतली. मात्र, तोच फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. रोहित शर्मा अवघ्या 11 धावा काढून बाद झाला. तो चौथ्या ओव्हरमध्ये आऊट झाला. तर इशान किशनने काही चांगले शॉट्स लगावले. पण तोही फार काळ मैदानावर तग धरू शकला नाही. तोही 15 धावा करून बाद झाला. रोहितला नवीन उल हकने बाद केलं. तर किशानची विकेट यश ठाकूरने घेतली. मुंबईने काल अवघ्या 38 धावा असताना दोन बळी गमावले होते.
मात्र, त्यानंतर कॅमरन ग्रीनने संघाला सावरलं. कॅमरनने धुवाँधार 41 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने त्याला उत्तम साथ देत 33 धावा ठोकल्या. दोघांनीही केवळ 38 चेंडूत 66 धावा केल्या. त्यामुळे 11 ओव्हरमध्ये मुंबईने शतकी खेळी केली होती. मात्र, 11 व्या ओव्हरमध्ये दोघे नवीनच्या समोर टिकाव धरू शकले नाही. दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये जावं लागलं. त्यानंतर तिलक वर्माने 26 आणि नेहाल वढेराने 23 धावांची खेळी करत मुंबई संघाला 182 पर्यंत नेऊन सोडलं होतं.