मुंबई | एशियन गेम्स 2023 स्पर्धेत यंदा वूमन्स आणि मेन्स क्रिकेट टीम इंडिया पहिल्यांदा सहभागी होणार आहेत. एशियन गेम्स स्पर्धेचं आयोजन हे चीनमध्ये 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं आहे. एशियन गेम्स स्पर्धा आशिया कप 2023 नंतर आणि आयसीसी वनडे वर्ल्ड कपदरम्यान पार पडणार आहे. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड हे वर्ल्ड कपच्या तयारीत आहे. त्यामुळे एशियन गेम्स स्पर्धेत टीम इंडियाच्या हेड कोच म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण यांची नियुक्ती करण्यात येऊ शकते.
हेड कोच शिवाय बॉलिंग कोचची जबाबदारी साईराज बहुतुले यांना देण्यात येऊ शकते. तर फिल्डिंग कोच म्हणून मनीष बाली यांच्याकडे सूत्रं दिली जाऊ शकतात. एशियन गेम्ससाठी बीसीसीआयने 14 जुलै रोजी भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. त्यानुसार दोन्ही संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच काही खेळाडूंचं प्रमोशन करण्यात आलंय. एशियन गेम्समध्ये मेन्स टीमची कॅप्टन्सी ऋतुराज गायकवाड करणार आहे. तर वूमन्स टीमचं नेतृत्व हरमनप्रीत कौर हीच्यातडे आहे.
दरम्यान मराठमोळ्या ऋषिकेश कानिटकर हे महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. फेब्रुवारी महिन्यात वूमन्स टी 20 वर्ल्ड कप पार पडला. या वर्ल्ड कपमध्ये कानिटकर यांनी हेड कोच म्हणून सर्व सूत्र सांभाळली होती. तसेच राजीब दत्ता हे बॉलिंग आणि सुभदीप घोष फिल्डिंग कोच म्हणून जबाबदारी पार पडतील.
एशियन गेम्ससाठी मेन्स टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)
राखीव खेळाडू | यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन.
एशियन गेम्ससाठी वूमन्स टीम इंडिया | हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिनू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री, अनिल छेत्री .
राखीव खेळाडू | हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक आणि पूजा वस्त्राकर.