Lalit Yadav Catch : अर्ध्या सेकंदात खेळ खल्लास; दोन बोटांनी घेतली कॅच; ‘त्या’ कडक कॅचचा व्हिडीओ व्हायरल

दिल्ली कॅपिटल्सच्या स्पिनरांनी आज आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवला. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांपुढे चेन्नईच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि ललित यादव यांनी दमदार गोलंदाजी करत आपला ठसा उमटवला.

Lalit Yadav Catch : अर्ध्या सेकंदात खेळ खल्लास; दोन बोटांनी घेतली कॅच; 'त्या' कडक कॅचचा व्हिडीओ व्हायरल
Lalit Yadav CatchImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 7:06 AM

चेन्नई : साधारणपणे आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची चर्चा होत असते. तसेच सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंचीही चर्चा होते. एवढेच काय सर्वाधिक विकेट काढणाऱ्या गोलंदाजांचीही चर्चा होत असते. कुणाची बॅट तळपणार आणि कुणाची बॉलिंग चालणार याकडे प्रत्येक सीजनमध्ये क्रिकेटप्रेमींचं लक्ष असतं. याशिवाय सीजनमधील खळबळ उडवून देणाऱ्या कॅचकडेही सर्वांचे लक्ष असते. आयपीएल हा झटपट धावा करण्यासाठीचा खेळ असल्याने या सामन्यात जबरदस्त कॅचही पाहायला मिळतात. या सीजनमधील अशीच एक जबरदस्त कॅच पाहायला मिळाली. आणि ही कॅच जमा झालीलय ललित यादवच्या नावावर.

हे सुद्धा वाचा

बुधवारी 10 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांविरोधात भिडले. रात्री खेळवल्या गेलेल्या या सामन्यात स्पिनर्सचा जलवा पाहायला मिळाला. कुलदीप यादव आणि अक्षर पटेलच्या समोर चेन्नईच्या फलंदाजांची गाळण उडाली. या दोघांना पार्ट टाईम स्पिनर ललित यादवची साथ मिळाली. ललितने अगदी साधारण सुरुवात करत एक मोठी विकेट काढली. मात्र, ही विकेट सामन्याला कलाटणी देणारी ठरली. अफलातून गोलंदाजी करत त्याने ही विकेट काढली.

अर्ध्या सेकंदात खेळ खल्लास

ललितने 12 वी ओव्हर टाकली. ललितच्या पहिल्या चेंडूवर अजिंक्य रहाणेने पायांचा वापर करत नॉन स्ट्राईकरला जोरदार शॉट लगावला. मात्र, तिकडे ललित उभा होता. ललितने चपळाई दाखवत जोरदार डाइव्ह मारली. यावेळी ललितचं नशीब जोरावर होतं. त्याचं टायमिंग जुळून आलं. त्याने आपल्या उजव्या हातातील दोन बोटे आणि अंगठ्यात चेंडू घट्ट पकडला आणि एक अफलातून झेल घेतला. या सीजनमधला हा अप्रतिम आणि अद्भूत झेल ठरला.

केवळ अर्ध्या सेकंदात ललितने ही कॅच पकडली. या कॅचमुळे संपूर्ण चेपॉक स्टेडियमही अवाक् झालं. रहाणेही थक्क झाला. केवळ प्रेक्षक आणि खेळाडूच नव्हे तर स्टंम्पच्या बाजूला उभा असलेला अंपायर क्रिस गैफनी यांनाही त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावरही आश्चर्याचे भाव होते. स्टेडियममध्ये प्रेक्षक उठून उभे राहिले.

त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. काय घडलं हे त्यांना कळलंच नाही. आपण जे पाहतो ते वास्तव आहे काय? यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. पण ललितने अवघ्या अर्ध्या सेकंदात आपला खेळ खल्लास केला होता. थोड्यावेळाने अचानक स्टेडियममध्ये एकच गलका झाला. प्रचंड जल्लोष करत ललितच्या या कॅचचं स्वागत करण्यात आलं.

CSK ने बनवल्या 167 धावा

या आधी अक्षर पटेलने चेन्नईच्या दोन्ही सलामीवीरांना अगदी किरकोळ धावांवर बाद केलं. त्याने डेवन कॉनवेला पायचीत केलं. तर ऋतुराज गायकवाडला झेलबाद केलं. तर कुलदीप यादवने मोईन अलीला घरचा रस्ता दाखवला. त्यानंतरही चेन्नईने 8 बळी देऊन 167 धावा केल्या होत्या. शिवम दुबेने 25 धावा ठोकल्या. धोनीने 20 धावांचं योगदान दिलं. या दोघांनी छोटी पण वेगवान खेळी खेळली. त्यामुळे चेन्नई हा धावांचा पल्ला गाठू शकली.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.