मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं आयोजन हे यंदा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. आयसीसीने वर्ल्ड कपचं वेळापत्रकही जाहीर केलं आहे. त्यानंतर आता आयसीसीने वर्ल्ड कपआधी होणऱ्या सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, स्पर्धेतील एकूण 10 सहभागी संघ प्रत्येकी 2-2 सामना खेळतील. या एकूण 10 सामन्यांचं आयोजन हे 3 शहरांमध्ये करण्यात आलं आहे. हे सामने गुवाहाटी, तिरुवनंतपूरम आणि हैदराबादमध्ये पार पडतील.
टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात वेळापत्रकानुसार 2 सामने खेळतील. टीम इंडियाचा पहिला सामना हा 30 सप्टेंबर रोजी पार पडेल. या सामन्यात टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. हा सराव सामना गुवाहाटी इथे आयोजित करण्यात आला आहे.
तर दुसरा सामना हा नेदरलँड विरुद्ध 3 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना तिरुअनंतपूरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडेल. इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे.
या सर्व सराव सामान्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. विशेष बाब म्हणजे सराव सामन्यांमध्ये 15 खेळाडूंना खेळण्याची परवानगी असणार आहे. 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आपला पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी हा हायव्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्याचं आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तर अंतिम सामना हा 19 नोव्हेंबरला पार पडणार आहे.
आयसीसीकडून सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर
10 matches across three cities in India 🏏
Official warm-up fixtures ahead of @CricketWorldCup 2023 ⬇️https://t.co/uUYeA9PwwZ
— ICC (@ICC) August 24, 2023
दरम्यान टीम इंडियाचं लक्ष यंदा हे वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावण्याकडे असणार आहे. टीम इंडिया अखेरचा वनडे वर्ल्ड कप हा 2011 मध्ये जिंकली होती. तेव्हापासून टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. यंदा तर भारतात वर्ल्ड कप होत असल्याने टीम इंडियाच्या वर्ल्ड कप जिंकण्याची शक्यता वाढली आहे.