मुंबई : श्रावणाचा दूसरा सोमवार (Shrawan Somwar) उद्या म्हणजेच 28 ऑगस्टला आहे. हा सोमवार विवीध अर्थाने विशेष असणार आहे. श्रावण सोमवारी शिवभक्त भोलेनाथाची वेगवेगळ्या प्रकारे पूजा करतात. अनेक जण श्रावण सोमवारी उपवास देखील करतात. श्रावण महिन्यात, केलेल्या शिवभक्तीमुळे भगवान शिव आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की, श्रावण सोमवारी विशेष प्रकारे शिवलिंगाची पूजा केल्याने जीवनात प्रगती आणि समृद्धी प्राप्त होते. यासोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीची कृपाही कायम राहते. चला जाणून घेऊया श्रावण सोमवारचे वेगवेगळे उपाय.
जर तुम्हाला तुमच्या नोकरी-व्यवसायाची चिंता वाटत असेल आणि तुमच्या मेहनतीनुसार चांगली प्रगती होत नसेल तर श्रावणाच्या सोमवारी उपवास करा आणि पाण्यात मध मिसळून शिवलिंगाला अभिषेक करा. तसेच शिवलिंगावर डाळिंबाचे फूल अर्पण करावे. असे केल्याने करिअरमध्ये प्रगतीची शक्यता निर्माण होते आणि नोकरी-व्यवसायातील सर्व चिंता दूर होतात.
धन-संपत्ती आणि सुख-संपत्ती वाढवण्यासाठी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व्रत ठेवावे आणि प्रदोष काळात शिवलिंगावर दह्याचा अभिषेक करावा. यासोबतच बेलपत्र, धतुरा इत्यादी वस्तू भगवान शिवाला अर्पण करा. असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सुख-शांतीसोबतच संपत्तीतही वाढ होते.
अडकलेले पैसे मिळवण्यासाठी श्रावण सोवमारी गाईला किंवा बैलाला हिरवा चारा खायला द्या. बैलाची पूजा भगवान भोलेनाथांचे वाहन नंदी म्हणून केली जाते. सावन महिन्यात बैलाला हिरवा चारा खायला दिल्यास अडकलेला पैसा लवकर येतो आणि धन वाढण्याचे शुभ योग सुरू होतात.
धन-धान्य वाढवण्यासाठी प्रदोष काळात श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी उसाच्या रसाने शिवलिंगाला अभिषेक करावा आणि शिव चालिसाचा पाठ करावा. यानंतर ‘ओम नमः शिवाय’ मंत्राचा 108 वेळा जप करा. शिवपुराणात सांगितले आहे की असे केल्याने धन-धान्य वाढते आणि लक्ष्मीचे आगमन होते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)