शनिदेव उपाय
Image Credit source: Social Media
मुंबई : शनिवारी शनिदेवाची पूजा केली जाते. शनिदेवाला न्याय देवता आणि कर्माचा दाता असेही म्हणतात. ज्योतिषांच्या मते शनिदेव प्रत्त्येकाच्या कर्मानुसार फळ देतात. जे चांगले कर्म करतात त्यांना शुभ फळ प्राप्त होते. तर, वाईट कृत्य करणाऱ्याला शिक्षादेखील होते. शनिदेवाच्या आशीर्वादामुळे माणूस रंकाचाही राजा होतो. दुसरीकडे, एखाद्या व्यक्तीला वाईट नजरेमुळे जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जीवनातील दु:ख, संकट दूर करण्यासाठी शनिवारी भाविक विधीपूर्वक शनिदेवाची पूजा करतात. तुम्हालाही शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तर शनिवारी हे उपाय (Shaniwar Upay) अवश्य करा.
शनिवार करा हे उपाय
- शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर शनिवारी काळ्या कुत्र्याची सेवा करा. जर काळा कुत्रा आजूबाजूला नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला खाद्य देऊ शकता. हा उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. अशा लोकांवर शनिदेवाची कृपा राहते.
- शनिदेवाला कर्म दाता म्हणतात. यासाठी शनिवारी शुभ कर्म करावे. तुम्ही गरीब आणि असहाय्य लोकांची सेवा करू शकता. अन्नदान करू शकता. तसेच तुम्ही त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी औषधांची व्यवस्था करू शकता. अशाप्रकारे चांगले कर्म करून तुम्ही शनिदेवाची कृपा प्राप्त करू शकता.
- व्यवसायात प्रगती करायची असेल तर शनिवारी स्नान आणि ध्यान करून पिंपळाच्या मुळामध्ये काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण करावे. तसेच शुद्ध तुपाचा दिवा लावून सुख, समृद्धी आणि उत्पन्न वाढीसाठी प्रार्थना करावी. यानंतर “ओम शन्नो देविर्भिष्टदापो भवनतु पीतये” या शनि मंत्राचा जप करा. हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार व्यवसायात यश मिळते.
- जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेदाची परिस्थिती असेल तर शनिवारी विधीपूर्वक हनुमानजीची पूजा करा. यावेळी सुंदरकांड पठण करावे. असे म्हणतात की शनिवारी हनुमानजींची पूजा केल्याने शनीच्या बाधांपासून मुक्ती मिळते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)