तुळजाभवानी देवीच्या चरणी भक्तांनी दिले भरभरून दान, उत्पन्नात इतक्या कोटींची वाढ

तुळजा भवानी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनाला येतात. दक्षिणेकडचा भाग जवळ असल्याने त्या भागात देखील देवीचे मोठ्या संख्येने भक्त आहेत. भक्त देवीच्या चरणी भरभरून दान करत असतात.  यंदा मंदिराच्या उत्पन्नात गेल्या एक वर्षात दुप्पटीने वाढ झाली आहे.

तुळजाभवानी देवीच्या चरणी भक्तांनी दिले भरभरून दान, उत्पन्नात इतक्या कोटींची वाढ
तुळजाभवानीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 11:27 PM

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला दूरवरून भक्त दर्शनाला येतात. तुळजा भवानी (Tulja Bhawani Maharashtra) ही महाराष्ट्र आणि भारतातील प्रमुख शक्तीपीठांपैकी एक आहे. दरवर्षी येथे लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनाला येतात. दक्षिणेकडचा भाग जवळ असल्याने त्या भागात देखील देवीचे मोठ्या संख्येने भक्त आहेत. भक्त देवीच्या चरणी भरभरून दान करत असतात.  यंदा मंदिराच्या उत्पन्नात गेल्या एक वर्षात दुप्पटीने वाढ झाली आहे. उत्पन्नाचा आकडा हा थक्क करणारा आहे.  2022-23 या एका वर्षात तब्बल 54 कोटी रुपयांची भर पडली आहे. या पैकी सर्वाधिक 15 कोटी रुपयांचे उत्पन्न हे सशुल्क दर्शनातून मिळाले आहे. सिंहासन व दानपेटीत 19 कोटीचे दान मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि मंदीर संस्थांनाचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.

अशी आहे तपशीलवार आकडेवारी

  • तुळजाभवानी मातेच्या मंदीर संस्थांनाचे उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 कोटीने वाढले असुन 2021-22 या वर्षात 29 कोटी उत्पन्न मिळाले.  2022-23 या वर्षात हे उत्पन्न वाढून थेट 54 कोटीवर गेले.
  • 2021-22 मध्ये सशुल्क दर्शनातून 7 कोटी 89 लाख तर 2022-23 मध्ये सशुल्क दर्शनातून 15 कोटी 54 लाख मिळाले. सिंहासन व दानपेटीत 2021-22 साली 8 कोटी 70 लाख तर 2022-23 मध्ये 19 कोटी 72 लाख उत्पन्न मिळाले. उत्पन्नाबरोबरच भाविकासाठी विविध उपाययोजनासाठी खर्चाचे प्रमाणही वाढले.
  • 2021-22 साली 10 कोटी 66 लाख खर्च झाला तर तो 2022-23 मध्ये 15 कोटी 63 लाख म्हणजे 5 कोटींचा अधिकचा खर्च झाला मात्र उत्पन्न 25 कोटीने वाढले.

सुविधा व उपाययोजनांमुळे झाली उत्पन्नत वाढ

भाविकांना सुलभ दर्शनासाठी दिलेल्या सुविधा व उपाययोजनामुळे हे उत्पन्न वाढले असुन याला विश्वस्त, पुजारी मंडळ, व्यापारी, स्थानिक नागरिक यांची साथ मिळाली. तुळजाभवानी मंदीर व परिसर, तुळजापूर शहराचा विकास आराखडा अंतीम टप्प्यात आहे. अनेक सुविधामुळे उत्पन्न व पर्यटन विकास होणार आहे. दर्शन मंडप,परिसर सुशोभीकरण यासह अनेक कामे होणार आहेत.

हे सुद्धा वाचा

सोन्या चांदीचे दानही मोठ्या प्रमाणात

भक्तांनी तुळजाभवानी चरणी सोन्या चांदीचेही दान मोठ्या प्रमाणात केले आहे. यामध्ये 2009 पासून 207 किलो सोने आणि 2 हजार 570 किलो चांदी सापडली आहे तर 354 हिऱ्यांचा देखील यात समावेश आहे. 15 दिवस ही प्रक्रिया चालली. काही चांदीच्या मोठ्या आकाराच्या वस्तूंची मोजदाद करता आलेली नाही. 2009 पूर्वी देवीला 81 किलो सोन्याचे दान करण्यात आले होते. त्यानंतर हे सोने वितळविण्यात आले होते त्यावेळी 47 किलो सोने हे शुद्ध असल्याचे आढळून आले होते, हे सोने सध्या आरबीआयकडे डिपॉझिट करण्यात आले आहे. 2009 वर्षानंतरच्या 207 किलो सोने पैकी 111 किलो शुद्ध सोने मिळू शकते अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली. देवीकडे जवळपास 160 किलो शुद्ध सोने जमा झाले आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.